रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदानची जनजागृती करुन माहिती पत्रके व संकल्प अर्जाचे वाटप
अहमदनगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अमृतमहोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन नेत्रदान-अवयवदान जनजागृतीने साजरा करण्यात आला. ध्वजारोहणनंतर रक्तदान, नेत्रदान, अवयवदान, देहदानची जनजागृती करुन माहिती पत्रके व संकल्प अर्जाचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दर्शना धोंडे, बाह्यसंपर्क वैद्यकिय अधिकारी डॉ.सोनाली बांगर, प्रशासकिय अधिकारी डॉ. गायकवाड, स्वीय सहाय्यक संजय ठोंबरे, वैद्यकिय अधिकारी, डॉ. मनोज घुगे, डॉ. अशोक कराळे, डॉ.भूषण अनभुले, डॉ. कटारिया, डॉ.बांगर, डॉ. खटके, डॉ. अरुण सोनवणे, डॉ. राऊत, डॉ. तांदळे, डॉ. सायगावकर, डॉ. देशमुख, डॉ.एस.के. सोनवणे, डॉ.एस. तांबोळी, नेत्र चिकित्सा अधिकारी डॉ. एस. चौधरी, नेत्रदान समुपदेशक सतिष आहिरे आदींसह जिल्हा रुग्णालय सर्व वैद्यकिय अधिकारी, प्रशासकिय अधिकारी-कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय घोगरे यांनी देशात अनेक नागरिक विविध अवयवांच्या प्रतिक्षेत असून, अवयवदानातून त्यांना नवजीवन मिळणार असल्याचे सांगून, त्यांनी मरणोत्तर नेत्रदानासह-ब्रेनडेड रुग्णांच्या नातेवाईकांना अवयवदानासाठी आवाहन केले. प्रास्ताविक डॉ. संतोष चौधरी यांनी केले अवयव व नेत्रदानाची गरज व महत्त्व सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेत्रदान समुपदेशक सतिश आहिरे यांनी केले.