महाआरोग्य शिबीराचा हजारो वारकर्यांनी घेतला लाभ
आरोग्यासह विविध सामाजिक विषयांवर जागृती
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आषाढी वारीसाठी निघालेल्या पायी दिंडी सोहळ्यातील वारकर्यांच्या आरोग्याची काळाजी घेतली. नगर-सोलापूर रोड, वाकोडी फाटा येथे तब्बल दहा दिवस निशुल्क वारकर्यांना आरोग्य सुविधा देण्यात आली. या आरोग्य सेवेचा हजारो वारकर्यांनी लाभ घेतला.
वारी विठुरायाची, काळजी आरोग्याची या बोध वाक्यासह जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनने मोफत महाआरोग्य शिबीर घेण्यात आले. फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे व सचिव डॉ. धनाजी बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारकर्यांना आरोग्य सेवा देण्यात आली. ऊन, थंडी, वारा, पाऊसाची तमा न बाळगता अविरतपणे पायी दिंड्या पंढरपूरला विठ्ठलच्या दर्शनाला जात असतात. यामध्ये अनेकांना सर्दी, खोकला, तापचा त्रास जाणवतो. तर काहींना शारीरिक इजा झाल्यास या आरोग्य शिबीराच्या माध्यमातून त्यांच्यावर उपचार करण्यात आले.
नुकतेच या महाआरोग्य शिबीराचा समारोप झाला. या शिबीरासाठी हरिभाऊ कर्डिले, संदीप राहींज, आरोग्यदूत अनिल राहींज, नामदेव सांगळे, श्रीराम निमसे, अशोक राहींज, सचिन राहींज, विशाल एजन्सी, दिनेश जगताप, मेजर मोहन बेरड, विजय पितळे, विष्णू विटकर, रवींद्र सिंग, विलास कर्डिले, गोरख लोखंडे, संजय भापकर, स्वप्निल राहींज, डॉ. राजे भोसले, किशोर दरेकर यांचे सहकार्य लाभले.
या शिबीरात आरोग्य तपासणी बरोबर विविध सामाजिक विषयांवर जागृती करण्यात आली. कॅन्सर रोखण्यासाठी तंबाखुमुक्ती, पर्यावरण संवर्धनासाठी झाडे लावा झाडे जगवा, लेक वाचवा लेक शिकवा, लोकशाही बळकट करण्यासाठी मतदान करणे, मद्यपान टाळणे, पाणी आडवा,पाणी जिरवा, प्लास्टिक बंदी आदी विषयांवर वारकर्यांना दररोज माहिती देण्यात आली.
डॉ. धनाजी बनसोडे यांनी वारकर्यांची तपासणी करुन उपचार दिले. तसेच वारकर्यांना नियमित फळ, बिस्किट, पाणी, फराळचे खाद्य पदार्थ व आरोग्यासाठी मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. या शिबीरात उपचाराबरोबर वारकर्यांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. 7 हजार 230 वारकर्यांनी शिबीराचा लाभ घेतला. तर 35 हजार वारकर्यांनी या केंद्रास भेट दिली. शिबीर यशस्वी करण्यासाठी देणगीदारांनी विशेष सहयोग देऊन वारकर्यांची सेवाही केली.