• Wed. Dec 11th, 2024

जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनचे चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण व स्वच्छता अभियान

ByMirror

Aug 9, 2022

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उपक्रम

ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊन ते जतन करणाचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त चांदबिबी महाल परिसरात वृक्षरोपण करुन स्वच्छता अभियान राबविण्यात आले. शहरातील ऐतिहासिक वास्तूंची काळजी घेऊन ते जतन करणाचा संदेश या अभियानातून देण्यात आला.


या वृक्षरोपण अभियानात चांदबिबी महाल येथील डोंगर परिसरात विविध ठिकाणी झाडे लावण्यात आली. या अभियानात फाऊंडेशनच्या अध्यक्षा अंबिका बनसोडे, सचिव डॉ. धनाजी बनसोडे, श्रीराम निमसे, ज्ञानेश्‍वर धुरवडे, जयश्री ताकतवार, गणेश जवळकर, विष्णू विटकर, रवींद्र सिंग, विजय पितळे, अरुण लोकरे, रमेश गुजर, किशोर दरेकर, मोहन बेरड, दिनेश जगताप आदींसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.


डॉ. धनाजी बनसोडे म्हणाले की, वृक्षरोपण ही देशसेवाच असून, याद्वारे पर्यावरणाचे समतोल राखून देशाला विकासाकडे घेऊन जाता येणार आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ व कचरामुक्त ठेवणे काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. अंबिका बनसोडे यांनी पर्यावरणाचे प्रश्‍न गंभीर बनत असताना प्रत्येक नागरिकाने सामाजिक उत्तरदायित्व या भावनेने एक वृक्ष लावून, त्याचे संवर्धन केले पाहिजे. हर घर तिरंगा बरोबरच हर घर वृक्ष देखील लागणे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी चांदबिबी महाल परिसरात पर्यटकांनी टाकून गेलेला प्लास्टिकचा कचरा मोठ्या प्रमाणात जमा करुन त्याची विल्हेवाट लावली. या अभियानासाठी माऊली तरुण मंडळ (वाकोडी फाटा), शिवप्रतिष्ठान मित्र मंडळ (दरेवाडी), जि.प. शिक्षक मंडळ यांचे सहकार्य लाभले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *