रिपाई महिला महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जागेच्या वादातून तोफखाना पोलीस स्टेशनला युवकांवर दाखल करण्यात आलेल्या अॅट्रोसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्ह्याची चौकशी करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या (गवई) वतीने पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. तक्रारदारांना कुठल्याही प्रकारची मारहाण झालेली नसताना निव्वळ जागेच्या वादाला जातीय जातीय स्वरूप देऊन अॅट्रॉसिटी दाखल करण्याच आल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी आरपीआय महिला आघाडीच्या शहराध्यक्षा ज्योती पवार, अनिता पाडळे, सोनाली पवार, बबई वाघमारे, निलम लोंढे, पूजा साठे, शोभा मीरपगार उपस्थित होत्या.
जिल्ह्यात जातीयवादी वृत्तीतून होणार्या अत्याचाराच्या घटना कित्येक आहेत. सर्वसाधारण व्यक्तीवर अन्याय झाल्यास त्याची दखल घेतली जात नाही. मारहाण केल्याचे पुरावे, जाती वृत्तीतून केलेली शिवीगाळ सर्व माहिती देऊन सुद्धा त्याचे ऐकून घेतले जात नाही. याबाबत सखोल चौकशी केली जाते. अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागतो. आरपीआयच्या माध्यमातून जातीय अत्याचाराचे प्रश्न हाताळताना अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होण्यासाठी अनेकवेळा आंदोलन उपोषण करावे लागते. परंतु 8 मार्च रोजी तोफखाना पोलीस स्टेशनमध्ये फिर्यादीला कोणत्याही प्रकारची दुखापत नसताना, जीशान शेख, अशोक शेकडे, तन्मीन शेख यांच्यावर अॅट्रोसिटी व जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. हा खोटा गुन्हा दाखल झाल्याचे निवेदनात म्हंटले आहे.
एका जमिनीच्या वादातून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्याला विनाकारण जातीय स्वरूप देऊन, अॅट्रोसिटी कायदा बदनाम करण्याचे काम केले जात आहे. खोट्या अॅट्रोसिटी थांबविण्यासाठी अशा पध्दतीने दाखल होत असलेल्या गुन्ह्यांची चौकशी करण्याची मागणी आरपीआय महिला आघाडीच्या वतीने पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.