मोहिमेचे चौथे वर्ष
भावी पिढीच्या कल्याणासाठी ज्येष्ठ नागरिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले -विशाल पाचारणे
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव जागरुक नागरिक मंचच्या वतीने हरित केडगाव मोहिमेच्या चौथ्या पर्वास सुरुवात करण्यात आली. सावली सोसायटी भूषण नगर भागात वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. वृक्ष लावून त्याच्या संवर्धनासाठी वृक्षसंरक्षक जाळ्या देखील लावण्यात आल्या.
केडगाव जागरुक नागरिक मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांच्या हस्ते वृक्षरोपण करुन या अभियानाची सुरुवात करण्यात आली. पर्यावरण समितीचे अध्यक्ष प्रकाश बिडकर यांनी सावली सोसायटीत शिकणार्या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची पुस्तके भेट दिली. पर्यावरण समितीचे उपाध्यक्ष उस्मान गनी मनियार यांनी सदर मोहीम जानेवारीतील मकर संक्रांत पर्यंत दर रविवारी केडगाव भागात विविध पर्यावरण स्नेही वृक्ष लागवड करून त्याचे संगोपन करून करण्यात येणार आहे असल्याची माहिती दिली.
भविष्यात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर होणार असून, भावी पिढीच्या कल्याणासाठी ज्येष्ठ नागरिक पर्यावरण संवर्धनासाठी सरसावले आहे. ज्येष्ठ नागरिकांनी अनेक झाडे लावून ती जगवली असल्याचे अध्यक्ष विशाल पाचारणे यांनी स्पष्ट केले. आरोग्य समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष बागले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपण आवश्यक असून, आपल्या भावी पिढीसाठी ज्येष्ठ नागरिकांनी राबविलेला उपक्रम कौतुकास्पद असल्याचे सांगितले. नगरसेवक अमोल येवले यांनी केडगाव हरित करण्यासाठी नागरिकांनी देखील या उपक्रमात सहभागी व्हावे. शहर हरित झाल्यास पर्यावरणाचे प्रश्न सुटून नागरिकांचे आरोग्य देखील चांगले राहणार असल्याचे सांगितले. सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल कोतकर यांनी केडगाव हरित करण्याचा उपक्रम एका वर्षा पुरता मर्यादीत न ठेवता त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दाखवलेली सातत्यतेने हा संकल्प पुर्णत्वास जाणार असल्याचे सांगितले. यावेळी मंचचे खजिनदार प्रवीण पाटसकर, सद्दाम शेख, नवनाथ बांबेरे, दिलीप ससे, गणेश पवार, किशोर जाधव, आकाश घावते आदींसह ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.