स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रीस्कूलचा उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन आलमगीर येथील स्पर्श सेवाभावी संस्था संचलित ऑर्किड प्रीस्कूल मध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी पूर्व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करुन मुलांच्या सदृढ आरोग्यावर मार्गदर्शन करण्यात आले. तर विद्यार्थ्यांची दर महिन्याला आरोग्य तपासणी करण्याचा निर्धार शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
डॉ. प्रताप जगन्नाथ नवले व डॉ. सौ. नवले यांच्या यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली. डॉ. प्रताप नवले म्हणाले की, लहान मुलांच्या सदृढ आरोग्यासाठी विशेष लक्ष देण्याची गरज आहे. लहान मुले मोबाईल मध्ये गुंतली जात असताना, त्याचा दुष्परिणाम आरोग्यावर होत आहे. मुलांना मैदानी खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहित करावे. तसेच मुलांना फास्टफुड न देता सकस आहार देण्यावर विशेष लक्ष दिल्यास अशा मुलांची चांगल्या पध्दतीने वाढ होत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात अमरीन सय्यद यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी शाळेत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. स्पर्श सेवाभावी संस्थेचे सचिव प्रवीण साळवे म्हणाले की, मुलांचे आरोग्य चांगले राहिल्यास भविष्यात सदृढ पिढी समाजात येणार आहे. मुलांच्या आरोग्यावर पालकांना जागृक करण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्पष्ट करुन त्यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सफिरा शेख व शुभांगी अमोलिक यांनी केले. आभार शितल साळवे यांनी मानले. या शिबीरासाठी भिंगार येथील नवले हॉस्पिटलचे विशेष सहकार्य मिळाले.