मागील वर्षी लावलेल्या वडांच्या झाडांची वर्षपुर्ती साजरी करुन पुन्हा 41 वडांची लागवड
माजी सैनिकांनी निसर्गपूजेतून दाखवलेल्या देशभक्तीला सलाम -वैष्णवीदीदी महाराज मुखेकर
अहमदनगर (प्रतिनिधी)- माजी सैनिकांच्या जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा, टेकड्या परिसर हिरवाईने फुलविण्याचे कार्य सुरु असून, या उपक्रमातंर्गत करंजी (ता. पाथर्डी) येथील मृत्युंजय वधस्तंभ व श्रीराम टेकडी परिसरात सलग दुसर्या वर्षी वडांच्या झाडाची लागवड करण्यात आली. तर मागील वर्षी या टेकडीवर लावण्यात आलेल्या झाडांनी बहरलेल्या निसर्गरम्य टेकडीची वर्षपुर्ती साजरी करण्यात आली.
वृक्षरोपण अभियानाची सुरुवात ह.भ.प. वैष्णवीदीदी महाराज मुखेकर यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी झुंबर क्षेत्रे, खजिनदार वसंत क्षेत्रे, सेक्रेटरी आनंद क्षेत्रे, माजी सरपंच राजेंद्र क्षेत्रे, छगनराव क्षेत्रे, प्रकाश क्षेत्रे, ज्येष्ठनेते भाऊसाहेब क्षेत्रे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रकाश शेलार, पत्रकार विलास मुखेकर, उपसरपंच नवनाथ आरोळे, वारकरी संघाचे अध्यक्ष नामदेव मुखेकर, राजू क्षेत्रे, संपत क्षेत्रे, ब्रदर प्रकाश क्षेत्रे, धीरज क्षेत्रे, मिठू अकोलकर, बन्सी हजारे, विवेक मोरे, माजी चेअरमन उत्तमराव अकोलकर, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, कृष्णा काकडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवाजी पालवे म्हणाले की, जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील डोंगररांगा हिरवाईने फुलणार आहे. मागील वर्षी मृत्युंजय वधस्तंभ व श्रीराम टेकडी परिसरात लावलेली सर्व झाडे जगविण्यात आली असून, या टेकडीवर प्रभू श्रीराम मंदिर उभारणीचे काम सुरु असून, हे मंदिराला निसर्ग सौंदर्याची झळाळी प्राप्त होणार आहे. हिरवाईने फुललेले मंदिर गावाचे वैभव ठरणार आहे. वृक्षरोपणाने निसर्ग सौंदर्य वाढून पर्यावरणाचे प्रश्न देखील सुटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ह.भ.प. वैष्णवीदीदी महाराज मुखेकर म्हणाले की, माजी सैनिकांनी निसर्गपूजेतून दाखवलेल्या देशभक्तीला सलाम असून, वृक्षरोपणाने पर्यावरणाचे प्रश्न सुटणार आहे. पर्यावरणाचे रक्षण ही प्रत्येकाची जबाबदारी असून, सामाजिक भावनेने जय हिंदने उभे केलेले कार्य प्रेरणा देणारे असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकाश शेलार यांनी माजी सैनिकांनी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून उभे केलेले कार्य पर्यावरण चळवळीला नवीन दिशा देणारे आहे. माजी सैनिकांच्या या देशभक्तीच्या कार्याला सलाम असल्याचे त्यांनी सांगितले. विलास श्रीमुखेकर व अध्यक्ष झुंबर क्षेत्रे यांनी लावलेली सर्व झाडे श्रीराम भजनी मंडळ व मृत्युंजय वधस्तंभ समिती जगवणारा असल्याचे स्पष्ट केले. मृत्युंजय वधस्तंभ येथे 20 तर श्रीराम टेकडी येथे 21 वडाच्या झाडांची लागवड करण्यात आली. उपसरपंच नवनाथ आरोळे यांनी ग्रामस्थांच्या वतीने जय हिंद फाउंडेशनच्या सर्व माजी सैनिकांचे आभार मानले.