भगवान महादेवाच्या पिंडाच्या आकारात बहरत आहे, पाचशे वडाची झाडे
माजी सैनिकांनी जिल्ह्यात वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ राबवून एक आदर्श निर्माण केला -ह.भ.प. सत्यपाल महाराज
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय हिंद फाऊंडेशन व कोल्हार (ता. पाथर्डी) ग्रामस्थांच्या वतीने गर्भगिरी पर्वत रांगेतील तीर्थक्षेत्र कोल्हुबाई माता गडावर लावलेल्या पाचशे झाडांचा दुसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. गडावरील महादेव मंदिर परिसरात वर्षभरापुर्वी भगवान महादेवाच्या पिंडाच्या आकारामध्ये पाचशे झाडे लावण्यात आलेली असून, ही झाडे बहरु लागली आहेत. काही वर्षांनी वडाच्या झाडांच्या रुपाने महादेवाची पिंडाचे भाविकांना दर्शन घेता येणार आहे.
ह.भ.प. सत्यपाल महाराज म्हणाले की, माजी सैनिकांनी जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्हाभर वृक्षरोपण व संवर्धनाची चळवळ राबवून एक आदर्श निर्माण केला आहे. माजी सैनिकांनी महादेवाच्या पिंडीच्या आकारात लावलेली झाडे पर्यटनाला चालना देणार असल्याचे सांगितले. तर आपल्या किर्तनातून निसर्ग पूजेचे आवाहन करुन जय हिंद फाऊंडेशनच्या माध्यमातून माजी सैनिक जिल्हाभर राबवित असलेल्या वृक्षरोपण चळवळीचे कौतुक केले.
माजी सभापती संभाजी पालवे यांनी माजी सैनिकांनी पर्यावरणाच्या रक्षणासाठी उचललेले पाऊन दिशादर्शक आहे. या चळवळीतून पर्यावरणाबाबत सकारात्मक बदल दिसून येणार असल्याचे सांगितले. झाडांची पूजा करुन त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी माजी मुख्याध्यापक महादेव पालवे, वन विभागाचे अधिकारी प्रवीण डमाळे, आधार फाउंडेशनचे जयवंत मोटे, शंकर मोटे, ह.भ.प. लक्ष्मण महाराज शिंदे, डॉ. दत्ता चंगेडीया, गुलाब शेख, माजी सरपंच कौसाबाई पालवे, करण जावळे, ग्रामपंचायत सदस्य किशोर पालवे, निवृत्त पोलीस अधिकारी शंकर डमाळे, गौरव गर्जे, आदिशक्ती फाउंडेशनच्या जया पालवे, ग्रामसेवक बनकर मॅडम, नंदकिशोर विधाते, अर्जुन चौरे, सागर निंबाळकर, ह.भ.प. गजानन चिंचोळेकर, रोशन राऊत, सुनील कुमार, राजेश धनगर, सरपंच शोभा पालवे, नंदू पालवे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, भाऊसाहेब देशमाने, बाबाजी पालवे, शंकर पालवे, अशोक जावळे, महादेव शिरसाठ, सुभेदार अशोक गर्जे, गोरक्ष पालवे, अशोक मुठे, ताराचंद ठोकळ, संजय सातपुते, बाबासाहेब गिते, माजी सरपंच महादेव गिते, रवी पालवे, दिनकर पालवे, शर्मा पालवे, रामा पालवे, पोपट सानप, एकनाथ पालवे, चंदू नेटके, आजिनाथ पालवे, रामा नटके, रघुनाथ औटी, डॉ. संजय पालवे, रमेश जावळे आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. आभार सुभेदार अशोक गर्जे यांनी मानले.