जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज व संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हास्तरीय निबंध व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन युवक-युवतींना सहभागी होण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे व युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे यांनी केले आहे.
शिवाजी महाराजांचे कार्य व विचार आणि स्वच्छतेचे महत्त्व शालेय विद्यार्थी व युवकांमध्ये रुजविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही स्पर्धा लहान गट (इयत्ता 5 वी ते 7 वी), मोठा गट (इयत्ता 8 वी ते 10 वी) व महाविद्यालयीन गटात होणार आहे. निबंध स्पर्धेसाठी रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज, धार्मिक एकतेचे प्रतिक शिवाजी महाराज, निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व, संत गाडगेबाबा यांचे जीवनकार्य तर चित्रकला स्पर्धेसाठी शिवाजी महारांचे गड-किल्ले, शिवाजी महाराजांचा पराक्रम, स्वच्छ सुंदर गाव, निसर्गाच्या सानिध्यातील गाव ही विषय तिन्ही गटासाठी देण्यात आली आहे. वरील विषयांवर निबंध दोनशे ते अडीचशे शब्दात लिहून तर रेखाटलेले चित्र दि.15 फेब्रुवारी पर्यंत संस्थेचे कार्यालय स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, निमगाव वाघा ता. जि. अहमदनगर 414005 या पत्त्यावर पाठवावे व अधिक माहितीसाठी 9226735346, 8605775261 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी युवा मंडळाच्या सचिव प्रतिभा डोंगरे, वाचनालयाच्या उपाध्यक्षा प्रियंका डोंगरे-ठाणगे, डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, सचिन जाधव, वैभव पवार, गौतम फलके, अक्षय ठाणगे, ऋषीकेश बोडखे परिश्रम घेत आहे. निबंध व चित्रकला स्पर्धेसाठी जिल्हा क्रीडा कार्यालय व नेहरु युवा केंद्राचे सहकार्य लाभत आहे.