अहमदनगर (प्रतिनिधी)- इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकौंटंटस ऑफ इंडियाच्या वतीने डिसेंबर 2021 मध्ये घेण्यात आलेल्या फायनल सीए परीक्षेत चैतन्य सुनील भागवत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला आहे. त्याला पुणे येथील सीए हेमंत जोशी, सीए आर. सहानी, सीए अंकित अग्रवाल, सीए अक्षय चव्हाण व नगर शहरातील सीए संदीप देसरडा, सीए प्रसाद भंडारी यांचे मार्गदर्शन लाभले. भागवत याचे शालेय शिक्षण रेणाविकर विद्यालय व उच्च माध्यमिक शिक्षण रेसिडेन्शियल महाविद्यालयात झाले आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.