• Mon. Dec 9th, 2024

चास व हिंगणगाव केंद्राच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा उत्साहात

ByMirror

Jul 29, 2022

शैक्षणिक वर्षातील कामकाज, शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासावर चर्चा

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील चास व हिंगणगाव केंद्राच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या मुख्यध्यापकांची सहविचार सभा निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालयात पार पडली. यामध्ये नवीन शैक्षणिक वर्षातील कामकाज, शैक्षणिक धोरण व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.


या सहविचार सभेत केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी व पदवीधर शिक्षक राजेंद्र खडके यांनी उपस्थित मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. यामध्ये मागील सभेची इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले. सरळ पोर्टल, विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे, आधार कार्डसाठी सर्व माहिती अपडेट करणे, गणवेश वाटप, मिशन आपुलकी अंतर्गत लोकसहभाग, सेतू चाचणी, अध्ययन स्तर निश्‍चित करणे, अल्पसंख्यांक विद्यार्थींची माहिती भरणे, मुख्यालय राहणेबाबत दाखले देणे, शिष्यवृत्ती परीक्षा आदींसह विशेष ग्रामसभेमध्ये शिक्षण विभाग/शाळांनी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली.

उपस्थित मुख्यध्यापकांनी मांडलेले विविध प्रश्‍न व विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या सहविचार सभेसाठी आलेल्या सर्व मुख्याध्यापकांचे स्वागत नवनाथ विद्यालयाचे मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कांडेकर यांनी केले. आभार सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *