• Thu. Dec 12th, 2024

ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांचा निमगाव वाघात सत्कार

ByMirror

Feb 16, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- खातगाव टाकळी (ता. नगर) येथील ग्रामसेविका अंजुम जुबेर शेख यांना नगर तालुका पंचायत समितीचा आदर्श ग्रामसेविका पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. निमगाव वाघा येथे डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा निमगाव वाघाचे ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी शेख यांचा सत्कार केला. यावेळी पै. विकास निकम, सलिम शेख, रशिद शेख, शफी शेख, नासीर शेख, रियाज शेख, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे आदी उपस्थित होते.
पै. नाना डोंगरे म्हणाले की, ग्रामसेविका अंजुम शेख हे गावाचे भूषण आहे. त्यांनी निमगाव वाघात कार्य करताना गावाची अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यासाठी सहकार्य केले. विशेषत: जलसंधारण व रस्त्याचे कामे मार्गी लावून गावात आपला वेगळा ठसा उमटविला. सध्या त्या खातगाव टाकळी येथे कार्यरत असून, त्या भागात देखील शासनाच्या कल्याणकारी योजना व गावाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी केलेले कार्य दिशादर्शक असल्याचे त्यांनी सांगितले. सत्काराला उत्तर देताना ग्रामसेविका अंजुम शेख यांनी गावातील व कुटुंबातील सदस्यांकडून झालेला सत्काराने भारावले असून, मिळालेला पुरस्कार, मान-सन्मान व सत्कार आनखी विकासात्मक कार्य करण्यास बळ देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *