निमगाव वाघा ग्रामपंचायतची मासिक सभा खेळीमेळीत
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुक्यातील निमगाव वाघाची मासिक सभा नुकतीच पार पडली. यामध्ये ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांना लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेचा राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेण्यात आला. तर सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने सरपंच रुपाली जाधव यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी उपसरपंच अलका गायकवाड, ग्रामविकास अधिकारी गोवर्धन राठोड, ग्रामपंचायत सदस्या उज्वला कापसे, लता फलके, किरण जाधव, प्रमोद जाधव, दिपक गायकवाड, सुजाता कापसे, मुन्नाबी शेख, संजय कापसे, दिपक जाधव, नवनाथ फलके उपस्थित होते.
सरपंच रुपाली जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मासिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या बैठकित पंधराव्या वित्त आयोगामधून विविध विकास कामाचे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला. जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी रजिस्टरचे वाचन करण्यात आले. आलेल्या अर्जाचे वाचन करुन त्यावर चर्चा करण्यात आली.
पै. नाना डोंगरे यांनी सत्काराला उत्तर देताना मिळालेला पुरस्कार हा ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे मिळाला आहे. गावात सामाजिक, शैक्षणिक व क्रीडाचे उपक्रम राबविण्यात येत असून, ग्रामीण भागातील खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य सुरु आहे. विकासात्मक बदल घडविण्यासाठी कटिबध्द असल्याचे त्यांनी सांगितले.