मोबाईलकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाणारे विद्यार्थी
अहमदनगर (प्रतिनिधी)- दोन वर्षानंतर कोरोनाने बंद पडलेल्या शाळा प्रत्यक्षात बुधवार (दि.15 जून) पासून सुरळीतपणे सुरु होत आहे. शहरातील ज्येष्ठ कलाशिक्षक नंदकुमार यन्नम यांनी ऑनलाईन अभासी शिक्षणाकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाताना विद्यार्थ्यांचे फलकावर रेखाटलेले चित्र सर्वांचे लक्ष वेधत आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी मैदान येथील श्री मार्कंडेय विद्यालयात कलाशिक्षक यन्नम यांनी बुधवारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी मोबाईलकडून प्रत्यक्ष शाळेकडे जाणारे विद्यार्थ्यांचे रेखाटलेले बोलके चित्र सर्वांचा कौतुकाचा विषय ठरत आहे. कला शिक्षक यन्नम यांचा हुबेहुब व्यक्तीचित्रन रेखाटण्याचा हातखंडा असून, त्यांनी महाराष्ट्रातील अनेक नामांकित व्यकीमत्वाचे चित्र रेखाटले असून, काही वर्षांपूर्वी एमआयआरसी मध्ये आलेले राष्ट्रपती प्रणवजी मुखर्जी यांचे देखील त्यांनी व्यक्तीचित्र रेखाटले होते.