शिक्षक दिनी जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना घडविणार्या वाळकी येथील शिक्षक सचिन भालसिंग यांचा शिक्षक दिनानिमित्त जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. मानवाधिकारचे नगर तालुकाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांनी त्यांचा सत्कार केला.
सचिन भालसिंग वाळकी या गावात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना खासगी क्लासच्या माध्यमातून शिक्षणाचे धडे देत आहे. अनेक गरीब व गरजू घटकातील विद्यार्थ्यांकडून फी न घेता त्यांचे भवितव्य घडवले असून, त्यांचे अनेक माजी विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे.
सचिन भालसिंग यांनी स्वत: गरिबीतून शिक्षण घेऊन पुढे आलो असल्याने याची जाणीव ठेऊन गरजू घटकातील विद्यार्थ्यांना आधार देत आहे. या सत्काराने शिक्षण क्षेत्रात आनखी चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. विजय भालसिंग म्हणाले की, शिक्षकांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य घडत असते. गुरुशिवाय जीवनात यश नसल्याचे सांगून, भालसिंग सरांनी घडवलेले अनेक विद्यार्थी शासकीय, वैद्यकिय, पोलीस व खासगी क्षेत्रातही उच्च पदावर कार्यरत आहे. शिक्षक हे समाजाचे भूषण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.