स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन आजी-माजी सैनिकांचा सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ख्रिश्चन एकता मंच व ख्रिस्ती समाज समन्वय समितीच्या वतीने हर घर तिरंगा उपक्रमांतर्गत जनजागृती रॅली काढण्यात आली. गळ्यात तिरंगा पंचा तर हातात तिरंगा ध्वज घेऊन ढोल, लेझीम पथकासह या रॅलीत सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांचे लक्ष वेधले. तर सीएसआरडी महाविद्यालयात स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन करुन आजी-माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला.
रॅलीत विद्यार्थ्यांनी दिलेल्या भारत माता की जय…, वंदे मातरम…. च्या घोषणांनी परिसर दुमदुमले. या रॅलीत सेंट सेव्हिअर्सच्या विद्यार्थिनींचे लेझिम पथक तर बॉईज हायस्कूलच्या विद्यार्थींचा ढोल पथक सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख मार्गावरुन मार्गक्रमण होऊन सीएसआरडी महाविद्यालयात रॅलीची सांगता झाली.
सीएसआरडी येथे स्वातंत्र्य सैनिकांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन बुथ हॉस्पिटलचे प्रशासक मेजर देवदान कळकुंबे यांच्या हस्ते झाले. ख्रिश्चन एकता मंचचे जिल्हाध्यक्ष प्रा. संदीप वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कार्यक्रमात बिशप तानाजी पाडळे, रेव्ह. अशोक पाडळे, जॉनसन शेक्सपीयर, रविंद्र ठोंबरे, युवक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, वंचित आघाडीचे प्रतिक बारसे, राजू देठे, विजय काकडे, आशितोष वाघमारे, अक्षय शिरसाठ आदी सहभागी झाले होते.
बाबा खरात यांनी स्वातंत्र्य लढ्यावर मार्गदर्शन केले. प्रा. संदीप वाघमारे यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी स्वतंत्र सैनिक व क्रांतिकारकांनी मोठा संघर्ष केला. तर अनेकांनी आपले बलिदान दिले. आजचा स्वातंत्र्य भारत त्यांच्या संघर्ष व बलिदानातून निर्माण झाला आहे. तिरंगा हा त्यांच्या त्याग, संघर्ष, बलिदान व सन्मानाचा प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी युवक जिल्हाध्यक्ष विजय शिरसाठ, उपाध्यक्ष श्याम वैरागर, सचिव अभिजीत पंडित, डॉ. प्रकाश बनसोडे, सुनिल बनसोडे, सॅम्युएल खरात, पास्टर जे.आर. वाघमारे, शशिकला सांळुंके, सचिन तेलधुने, ईश्वरी जाधव, संपदा म्हस्के आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापिका जे.वाय. शिंदे, डेव्हिड पाटोळे, पिंटो सर, जॉन सर, सौ.त्रिभूवन, जगताप व देठे मॅडम यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल जाधव यांनी केले. आभार विकास जाधव यांनी मानले.