• Thu. Dec 12th, 2024

क्रीडा व शारीरिक शिक्षणातील आधुनिकीकरणासाठी ऑलम्पिक असोसिएशनचा पुढाकार

ByMirror

Feb 14, 2022

हाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच बैठक

अहमदनगर (प्रतिनिधी)- क्रीडा क्षेत्रातील नवनवीन बदल शिक्षक-प्रशिक्षक यांना अवगत व्हावेत, ऑलम्पिक दर्जाचे प्रशिक्षक शालेय पातळीपासून तयार व्हावे, या करीता महाराष्ट्र ऑलम्पिक असोशिएशन ट्रेनिंग सेंटर चालू करण्याचा विचार करत आहे. शारीरिक शिक्षणात नवनवीन तंत्रे व उच्च दर्जाचा अभ्यासक्रमाचा समावेश व्हावा याकरीता अभ्यासगट व संशोधनासाठी मदत करणार असल्याचे मत ऑलिम्पिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र ऑलम्पिक असोसिएशन, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व क्रीडा संघटनांची महाराष्ट्रात पहिल्यांदाच बैठक पार पडली त्या बैठकीत शिरगावकर बोलत होते. सुमारे अडीच तास चाललेल्या बैठकीस शारीरिक शिक्षण व क्रीडा विषयक समस्या, शासन निर्णयातील तरतुदी, कृती आराखडा, नियोजन व करावयाच्या उपाययोजना, नोकरभरती, क्रीडा ग्रेसगुण व विविध प्रश्‍ना संदर्भात प्रतिनिधींची मते जाणून घेतली. शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना व खेळ संघटना यांचे कार्यप्रणालीत ढवळाढवळ न करता संघटनांच्या कार्याला व कृतीयुक्त विचाराला महाराष्ट्र ऑलिंपिक सर्वतोपरी पाठबळ देईल असे शिरगावकर यांनी प्रतिपादन केले.
या बैठकीस महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक महासंघाचे राजेंद्र कोतकर, मच्छिंद्र ओव्हळ, अमरावती शारीरिक शिक्षण महामंडळाचे शिवदत्त ढवळे, समन्वय समितीचे विश्‍वनाथ पाटोळे, ज्ञानेश काळे, क्रीडा संघर्ष समितीचे सचिव अविनाश ओंबासे, शालेय खेळ बचाव समितीचे अध्यक्ष शाम भोसले, शिवाजी साळुंके, क्रीडा विकास परिषदेचे अशोक सरोदे, पुरुषोत्तम जगताप, मुंबई महानगर पालिका युनीटचे डॉ. जितेंद्र लिंबकर, चंद्रकांत छोडेराव, पँथर स्पोर्ट्सचे संजय कांबळे, युवा संघटनेचे तायप्पा शेंडगे, संदिप मनोरे, आगाशियन मंडळाचे गणेश जोरावर, लखन मोरे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संघटना प्रतिनिधी समवेत ऑलम्पिक असोशिएशनचे सहसचिव दयानंद, कार्यकारी अधिकारी राजेंद्र घुले उपस्थित होते. सभेच्या नियोजनात शिवाजी साळुंके यांनी मोलाची भूमिका बजावली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *