मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजात केलेल्या कार्याची दखल घेतली जाते -पद्मश्री पोपट पवार
अहमदनगर (प्रतिनिधी)- लोककला, कलावंत साहित्यिक परिषदेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांना राज्यस्तरीय क्रीडा भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा पद्मश्री पोपट पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच परिषदेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता काकडे, सचिव विकास जाधव, जिल्हाध्यक्ष आबासाहेब सोनवणे आदी उपस्थित होते.
पद्मश्री पोपट पवार यांनी मान, सन्मानाची अपेक्षा न ठेवता समाजात केलेल्या कार्याची दखल घेतली जाते. सामाजिक कार्यकर्ते पै. नाना डोंगरे यांचे उत्तमपणे सामाजिक कार्य सुरु असून, शैक्षणिक, पर्यावरण, क्रीडा व धार्मिक क्षेत्रातही ते योगदान देत असल्याचे त्यांनी कौतुक केले. स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण क्रीडा व धार्मिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनिय कार्याबद्दल नुकताच डोंगरे यांना पुरस्कार मिळाला असून, याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.