एस.टी. बँक कर्मचार्यांच्या वतीने सत्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- को- ऑपरेटिव्ह बँक एम्प्लॉईज युनियनचे (मुंबई) राज्य कार्याध्यक्ष सुनिल साळवी व संघटक सचिव संदेश चव्हाण यांचे एस.टी. बँक कर्मचार्यांच्या वतीने शहरात स्वागत करण्यात आले. नुकतेच साळवी व चव्हाण यांनी अहमदनगर शहरात आले असता, त्यांनी एस.टी. बँक कर्मचार्यांची भेट घेतली.
सामाजिक कार्यकर्ते तथा एस.टी. बँकेचे कर्मचारी विजय भालसिंग यांनी साळवी व चव्हाण यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी शाखेचे ज्युनियर ऑफिसर आदिनाथ कुलट, रवींद्र खर्डे, दिलीप कासार, पोपट आडसूळ, बापू भिसे, बाजीराव कासार, चंद्रकांत बकरे, शिवाजी कुलट, सुदाम बोरुडे, मोहन जगदाळे, जालिंदर बोरुडे, बाळासाहेब ढगे, शिवाजी घोडके, बाळासाहेब खरमाळे आदी उपस्थित होते.