अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत अहमदनगर जिल्हा रुग्णालयात आरोग्य सेवा देऊन अनेक गोर-गरीब व सर्वसामान्यांचे जीव वाचविल्याबद्दल एम.डी. मेडिसीन डॉ. संतोष गिते यांना छत्रपती शिवाजी शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
हिंदू राष्ट्र सेनेचे धनंजय देसाई व काली पुत्र कालीचरण महाराज यांच्या हस्ते डॉ. गिते यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी डॉ. अमोल नरसाळे, डॉ. नंदकिशोर नरसाळे, माजी सभापती संभाजीराव पालवे, डॉ. अमोल जाधवर, सरपंच संतोष शिंदे, जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, मुख्याध्यापक महादेव पालवे, अशोक पालवे, जोशी, पोलीस अधिकारी शंकर डमाळे, मुख्याध्यापक देवीदास गीते, हिंदू राष्ट्र सेनेचे किशोर पालवे आदी उपस्थित होते.
डॉ. संतोष गिते यांनी कोरोना काळात जिल्हा रुग्णालयात सेवा देऊन अनेक गोर-गरीबांना कोरोना काळात जीवनदान दिले. सध्या ते भिस्तबाग येथे आपल्या खासगी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना देवा देत असून, मोफत आरोग्य शिबीर घेऊन गरजू घटकांना आधार देण्याचे कार्य करत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार शिवाजी कर्डिले व आमदार संग्राम जगताप यांनी त्यांचे अभिनंदन केले.