जय मल्हार सामाजिक संस्थेच्या वतीने पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या (केडगाव) वतीने कोरोना काळात योगदान देणार्यांसह सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, वैद्यकीय व पर्यावरण विषयक उत्कृष्ट काम करणार्या व्यक्तींना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जीवन गौरव पुरस्कार व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युवा गौरव पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जाडकर यांनी केले आहे.
जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था हि उपेक्षित घटकासाठी काम करत असून, सामाजिक कार्यात योगदान देणार्यांना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती दिनी मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण केले जाते. मागील दोन वर्षापासून कोरोनामुळे संस्थेच्या वतीने जयंतीचा कार्यक्रम होऊ शकला नाही. मात्र या वर्षी दि.31 मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संस्थेच्या वतीने उत्साहात साजरी केली जाणार आहे. कोरोना काळात व विविध क्षेत्रामधे उल्लेखनीय काम करणार्या व्यक्तींना पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सदर पुरस्कारासाठी प्रस्ताव दि.20 मे पर्यंत कांतीलाल महादेव जाडकर संस्थापक- अध्यक्ष, जय मल्हार शैक्षणिक व बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रोबंगला नं-1, ओंकार नगर (पाण्याच्या टाकी जवळ) केडगाव (देवी) अहमदनगर 414005 या पत्यावर पाठवण्याचे सांगण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 8805922960 या नंबरवर संपर्क साधावा.