शहरात संग्रामपर्वाच्या विकासात्मक व्हिजनने बदल घडला -बाबासाहेब बोडखे
आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसाचा सामाजिक उपक्रम
अहमदनगर (प्रतिनिधी)- आमदार संग्राम जगताप यांचा वाढदिवस शहरात विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. या उपक्रमाचा एक भाग म्हणून माध्यमिक शिक्षक सोसायटीचे संचालक तथा शिक्षक परिषदेचे नेते बाबासाहेब बोडखे, संचालक महेंद्र हिंगे, निलेशकुमार बांगर, अमोल क्षीरसागर, विराज बोडखे यांनी कोरोना काळात रोजगार हिरावलेल्या व आर्थिक परिस्थिती बिकट असलेल्या तपोवन रोड येथील कामगारांच्या पालावर जाऊन किराणा किट, भाजीपाल व त्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. जीवनावश्यक साहित्य व मुलांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळताच कामगारांच्या चेहर्यावर समाधान फुलले होते.
बाबासाहेब बोडखे म्हणाले की, शहरात संग्रामपर्वाच्या विकासात्मक व्हिजनने बदल घडला आहे. शहराचा व उपनगरांचा कायापालट होत आहे. प्रत्येक गरजूंना मदतीचा हात, या भावनेने आमदार संग्राम जगताप यांचे कार्य सुरु आहे. कोरोना काळात त्यांनी सर्व गरजूंना मदतीचा हात व आधार देण्याचे काम केले होते. दरवर्षी त्यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा करुन, गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
महेंद्र हिंगे यांनी कोरोनाच्या संकटकाळात सर्वसामान्यांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. लवकरच विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु होणार असून, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.