सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद -उपमहापौर गणेश भोसले
अहमदनगर (प्रतिनिधी)- कोरोनाच्या संकट काळात शहरात विविध सेवाभावी संस्थांच्या माध्यमातून सामाजिक योगदान देत, सीए व डॉक्टर झालेल्या युवक-युवतींचा घर घर लंगर सेवेच्या वतीने सन्मान करण्यात आला. हॉटेल अशोका येथे उपमहापौर गणेश भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सत्कार समारंभाप्रसंगी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, जनक अहुजा, प्रीतपालसिंह धुप्पड, राजेंद्र कंत्रोड, जय रंगलानी, राहुल बजाज, प्रशांत मुनोत, मनोज मदान, सतीश गंभीर, सुनील थोरात, कैलास नवलाणी, मन्नू कुकरेजा, टोनी कुकरेजा, आशिष कुमार, सी.ए. कुशल विज्जन, करण धुप्पड, प्रमोद पंतम, शरद बेरड, पुरुषोत्तम बेट्टी, राम बालानी, सागर पंजाबी आदी उपस्थित होते.
मागील दोन वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे अभ्यास ऑनलाईन झाले होते. मिळालेल्या वेळेत युवकांनी कोरोनाच्या टाळेबंदीत युवक-युवतींनी तर काहींच्या पालकांनी आपल्या परीने योगदान देऊन सेवा दिली. नुकतेच झालेल्या सीए फायनल परीक्षेत जिल्ह्यात दुसरा आलेला अमरनाथ सहानी तसेच रितेश राजू जग्गी, सिमरन सहानी, ओमकार विजन, विशाल खुबचंदानी, मोना अनिल आसुदानी, प्रेम शामलाल दुसेजा उत्तीर्ण झाल्याबद्दल तर डॉक्टर झालेले डॉ. पायल अशोक खूबचंदानी, डॉ. ज्योती अशोक खूबचंदानी, डॉ. हर्ष विजन वोहरा यांचा सत्कार करण्यात आला.
उपमहापौर गणेश भोसले म्हणाले की, सामाजिक योगदान देऊन युवकांनी मिळवलेले यश अभिमानास्पद आहे. घर घर लंगर सेवेने गरजू घटकांना मोठा आधार दिला असल्याचे स्पष्ट करुन लंगर सेवेचे कौतुक केले. हरजितसिंह वधवा यांनी कठीण परिस्थितीत देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश कौतुकास पात्र आहे. पंजाबी, सिंधी समाज बांधव शक्यतो व्यापारात असतात, सीए व आरोग्य क्षेत्रात त्यांनी मिळवलेले यश प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले.