• Mon. Dec 9th, 2024

कोठला स्टॅण्ड येथे साई फ्लॉवर्स अ‍ॅण्ड डेकोरेशनच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ

ByMirror

Mar 28, 2022

फ्लॉवर्स डेकोरेशनमुळे शेतकर्‍यांच्या फुल उत्पादनांना चांगली बाजारपेठ -आ. संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- फ्लॉवर्स डेकोरेशन व्यवसायाच्या माध्यमातून शेतकर्‍यांनी पिकवलेल्या फुल उत्पादनांना चांगली बाजारपेठ निर्माण झाली आहे. धार्मिक कार्याबरोबरच सण, उत्सव व समारंभात फुलांची व आकर्षक बुकेंची मागणी दिवसंदिवस वाढत आहे. या व्यवसायामुळे अनेक युवकांना रोजगार मिळाला असून, युवकांनी नवनवीन रोजगाराच्या संधी निर्माण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. तसेच साई फ्लॉवर्स ने शहरासह जिल्ह्यात विविध ठिकाणी शाखेद्वारे नावलौकिक कमवून, अनेक युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिल्याचे कौतुक केले.
शहरातील कोठला स्टॅण्ड, मिलीटरी मस्जिद समोर साई फ्लॉवर्स अ‍ॅण्ड डेकोरेशनच्या चौथ्या शाखेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, महेंद्र उपाध्याय, साहेबान जहागीरदार, संचालक नईम खान, रईस खान, जफर खान, दत्तू भुतारे, शोएब खान, शकिल खान, सुफियान खान आदी उपस्थित होते.
प्रारंभी संध्याकाळी हजरत मोहसिन अली शाह चिश्ती यांनी या शाखेला भेट देऊन शुभेच्छा दिल्या व व्यवसायाच्या भरभराटीसाठी प्रार्थना केली. शहरात सुरु केलेल्या या शाखेच्या माध्यमातून साई फ्लॉवर्स अ‍ॅण्ड डेकोरेशन नगरकरांना आकर्षक पध्दतीचे बुके, लग्नाचे पाकळी हार, फ्लॉवर डेकोरेशन, आर्टिफिशियल फुलांचे साहित्य, बर्थडे सजावटचे साहित्य आदी सेवा उपलब्ध करुन दिली आहे. विशेष म्हणजे ही सेवा ग्राहकांना ऑनलाईन पध्दतीने होम डिलीवर देण्यात येणार आहे. शहरासह जिल्ह्यात इतर ठिकाणी तीन शाखा कार्यरत असून, ग्राहकांचा वाढता प्रतिसादामुळे चौथी शाखा सुरु करण्यात आल्याची माहिती संचालक नईम खान यांनी दिली.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *