अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव येथे अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन धार्मिक व सामाजिक एकतेचा संदेश देऊन साजरा करण्यात आला. केडगाव मुस्लिम समाज, केडगाव जागरूक नागरिक मंच, शाही मस्जिद व फिरदोस मस्जिद शाहुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
केडगाव युवा मुस्लिमचे अध्यक्ष तन्वीर सय्यद, सिराज शेख, सद्दाम शेख, वाहिद सय्यद, जावेद पठाण, समीर मारी, शफीक पठाण, नदीम जुग्या, शाहरुक शेख, साबिर शेख, आसिफ शेख, साहिल शेख, अजहर शेख, आफताब शेख, शामवेल पाटोळे, अरकान शेख, आयान शेख, दानिश बागवान, इक्बाल सय्यद, सोहेल, तौसिफ शेख, शाहरुख शेख मंचचे अध्यक्ष विशाल पाचारणे या पुढाकारातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कर्नल आजाद बकाली, अब्दुल सय्यद, निजाम शेख, हमीद सय्यद, मंचचे उपाध्यक्ष अनिल मरकड, पर्यावरण समिती अध्यक्ष प्रकाश बिडकर, उपाध्यक्ष हाजी उस्मानगनी मनियार, डॉ. सुभाष बागले, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, विजय पठारे आदी उपस्थित होते.