नगरसेवक राहुल कांबळे मित्र मंडळ व संदीप कोतकर मित्र मंडळाच्या वतीने अभिवादन
अहमदनगर (प्रतिनिधी)- केडगाव उपनगरात नगरसेवक राहुल कांबळे मित्र मंडळ व संदीप कोतकर मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. केडगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक राहुल कांबळे, नगरसेवक गणेश नन्नवरे, सुरज शेळके, एकनाथ कोतकर, अशोक गायकवाड, संभाजी पवार, सोनू घेंबुड, भूषण गुंड, श्याम कोतकर, माउली जाधव, सुमित लोंढे, सागर सातपुते, भरत कांबळे, सचिन सरोदे, केतन कांबळे, महेश कांबळे, गणेश नंदकर, सद्दाम शेख, अरुण गायकवाड, ऋषी गवळी, तुकाराम कोतकर, राहुल कोतकर, विशाल भिंगारदिवे, सुरेश बनसोडे, बंटी कांबळे, पोपट कांबळे, सुनील कांबळे, रुपेश कांबळे, अविनाश साठे, बाळासाहेब रणे, सतीश पाचारणे, अभिषेक शिरवाळे, दिलवार शेख, प्रविण पाचरणे आदींसह केडगाव ग्रामस्थ युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.