उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगे
उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज -पो.नि. मेघश्याम डांगे
केडगावच्या जे.एस.एस. गुरुकुलला 12 ए आणि 80 जी मानांकन प्राप्त
अहमदनगर (प्रतिनिधी)- जग झपाट्याने बदलत असताना, पारंपारिक शिक्षणापुढे जाऊन विद्यार्थ्यांना ज्ञानसंपन्न करण्याची गरज आहे. तंत्रज्ञानाने जग जवळ आले असून, शिक्षण क्षेत्र विस्तारले गेले आहे. मुलांच्या उज्वल भवितव्य व जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी शिक्षणाच्या नवीन वाटेने जाण्याची गरज असल्याचे प्रतिपादन पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे पाटील यांनी केले.
केडगाव येथील जे.एस.एस. गुरुकुलला नुकतेच 12 ए आणि 80 जी मानांकन प्राप्त झाले. शाळेला मिळालेल्या या मानांकनाचे प्रमाणपत्राचे अनावरण पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे पाटील आणि सीए अभय कटारिया यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डांगे बोलत होते.
सीए अभय कटारिया यांनी सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना बदलत्या काळानुरुप अद्यावत शिक्षण देण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुल सज्ज आहे. भविष्याचा वेध घेऊन सेवाभावाने शाळेची वाटचाल सुरु आहे. 12 ए आणि 80 जी मानांकन असणार्या शैक्षणिक स्कूलला आर्थिक मदत देणार्यांना इन्कम टॅक्स रिर्टनमध्ये पन्नास टक्के सवलत मिळणार असल्याची माहिती त्यांनी दिली. लीड ऑर्गनायझेशनचे स्वप्निल वाटेगावकर यांनी लीडचा उपयोगाने मुलांचा बौद्धिक विकास साधला जाणार असल्याचे सांगून, लीड संदर्भात पालकांशी संवाद साधून सविस्तर माहिती दिली. प्राध्यापक आनंद कटारिया आणि उपप्राचार्य निकिता कटारिया यांनी पाहुण्यांचे स्वागत करुन विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली. उपस्थित पाहुणे व पालकांनी जे.एस.एस. गुरुकुलच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करुन समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माधवी जक्कल यांनी केले. आभार अफशा शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे.एस.एस. गुरुकुलच्या शिक्षकांनी परिश्रम घेतले.