अहमदनगर जिल्ह्याला मोठ्या पैलवानांचा वारसा -शंकर अण्णा पुजारी
अहमदनगर (प्रतिनिधी)- छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेनिमित्त शहरात आलेले कुस्ती मल्ल विद्येचे अध्यक्ष पै. गणेश मानगुडे, कुस्तीचे प्रसिध्द निवेदक शंकर अण्णा पुजारी व अहमदनगर जिल्हा तालिम संघाचे खजिनदार पै. नाना डोंगरे यांचा कुस्ती क्षेत्रातील योगदानाबद्दल उद्योजक राजूशेठ फुलसौंदर व सिने अभिनेते प्रशांत नेटके यांनी सत्कार केला. यावेळी शेखर आढाव, भाऊ धुमने, सादिक मन्यार आदी उपस्थित होते.
पै. गणेश मानगुडे यांनी शहरात झालेल्या छत्रपती शिवराय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे उत्कृष्टपणे नियोजन करण्यात आले होते. कुस्ती मल्ल विद्या कुस्तीच्या प्रचार-प्रसारासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. शंकर अण्णा पुजारी यांनी अहमदनगर जिल्ह्याला मोठ्या पैलवानांचा वारसा लाभलेला असून, या स्पर्धेने कुस्तीला चालना मिळाली असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. उद्योजक राजूशेठ फुलसौंदर यांनी पै. नाना डोंगरे ग्रामीण भागात मल्ल घडविण्यासाठी मोठे योगदान देत असून, त्यांनी आपल्या मुलींना देखील राष्ट्रीय कुस्तीपटू बनवल्याबद्दल कौतुक केले.