अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे नवनिर्वाचित सरचिटणीस अर्जुनवीर पुरस्कार विजेते पै. काकासाहेब पवार शहरात आले असता पै. संजय (काका) शेळके यांनी त्यांचा सत्कार करुन स्वागत केले.
यावेळी शिवछत्रपती पुरस्कार विजेते पैलवान गोविंद (तात्या) पवार, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष तथा जिल्हा तालिम संघाचे अध्यक्ष पै. वैभव लांडगे, मिलिंद जपे, विलास चव्हाण, नामदेव लंगोटे, पै. बंडू शेळके आदी उपस्थित होते.