अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022
अहमदनगर (प्रतिनिधी)- फिरोदिया शिवाजीयन्स व फर्नांडिस परिवाराच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर डिस्ट्रिक्ट फुटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित करण्यात आलेल्या सातव्या अॅलेक्स फर्नांडिस फुटबॉल चषक 2022 स्पर्धेत रंगतदार सामने होत आहे. भुईकोट किल्ल्याच्या मैदानावर फुटबॉलचा थरार पाहण्यासाठी प्रेक्षक मोठी गर्दी करत आहे.
स्पर्धेच्या दुसर्या दिवशी फुटबॉल संघटनेचे उपाध्यक्ष खालिद सय्यद, एएसआय राजू पाटोळे, हसन शेख, सहसचिव गोपीचंद परदेशी, राहुल गायकवाड, विक्टर जोसेफ, विलास शेलार यांच्या उपस्थितीमध्ये दोन्ही सामने लावण्यात आले.
फ्रेंडस स्पोर्टस क्लब विरुध्द बाटा एफसी यांच्यात अत्यंत अटीतटीचा झाला. यामध्ये 35 मिनटाच्या दोन राऊंडमध्ये दोन्ही संघाला गोल करता आले नसल्याने हा सामना अनिर्णित राहिला.
दुसरा सामना गुलमोहर स्पोर्टस विरुध्द सिटी क्लब यांच्यात झाला. यामध्ये गुलमोहर स्पोर्टसने आक्रमक खेळी केली. गुलमोहर स्पोर्टस कडून ऋषी कनोजिया 2, रोहन सावंत व जेशू कशली याने प्रत्येकी 1 गोल केला. गुलमोहर स्पोर्टसने 4-0 गोलने सिटी क्लबवर एकहाती विजय मिळवला.