अभ्यासू व शेतकर्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला -दत्तात्रय गायकवाड
अहमदनगर(प्रतिनिधी)- कापूरवाडी (ता. नगर) गावाच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी डॉ. मीनानाथ एकनाथ दुसुंगे यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल राजीव गांधी पतसंस्थेचे संचालक दत्तात्रय गायकवाड व अहमदनगर भाजीपाला असोसिएशनचे सचिव मोहन गायकवाड यांनी त्यांचा सत्कार केला.
कृषी उत्पन्न बाजार समिती येथे झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी आदिनाथ मगर, उमेश भांबरकर, प्रविण गुंजाळ, ऋषिकेश गायकवाड आदी उपस्थित होते. दत्तात्रय गायकवाड म्हणाले की, डॉ. मीनानाथ दुसुंगे यांची कापूरवाडीच्या विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी नियुक्ती झाल्याने गावाला एक अभ्यासू व शेतकर्यांच्या प्रश्नाची जाणीव असलेला लोकप्रतिनिधी सोसायटीला मिळाला आहे. त्यांच्या कार्यातून गावाचा विकास साध्य होण्यासाठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले. चेअरमन डॉ. मीनानाथ दुसुंगे यांनी सत्काराला उत्तर देताना तळागाळातील कष्टकरी शेतकर्यांच्या न्याय, हक्कासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे सांगितले.