हॉकर्सना रोजगारासाठी हॉकर्स झोन निर्माण करुन देण्याची केली गृहमंत्री यांच्याकडे मागणी
अहमदनगर (प्रतिनिधी)- समाजवादी पार्टीचे आमदार अबू असीम आझमी यांना समाजवादीचे जिल्हाध्यक्ष अजीम राजे यांनी कापड बाजार येथील एका व्यापारी व हॉकर्सच्या आपसातील भांडणानंतर या प्रकरणाला राजकीय वळण लागून महापालिकेने अतिक्रमणाच्या नावाखाली उगारलेला कारवाईचा बडगा व त्यानंतर सर्व हॉकर्सवर आलेली उपासमारीची वेळ याबद्दल माहिती दिली. यावर आजमी यांनी कापड बाजार येथील गोरगरीब हातगाडी धारक यांना व्यवसाय करण्यासाठी अडचण निर्माण होत असताना व्यवसाय सुरळीत सुरु राहण्यासाठी व तेथे कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना निवेदन दिले.
कापड बाजार येथे हातगाड्यांवर व्यवसाय करणार्यांवर काही स्थानिक नागरिक त्यांच्या स्वतःच्या वैयक्तिक कारणामुळे सर्व हातगाड्या धारकांना धारेवर धरून विनाकारण सर्व हातगाड्या धारकांना बाजारातून काढण्याचा व्यापार्यांचा प्रयत्न सुरु आहे. हे सर्व हातगाड्या धारक अनेक वर्षापासून तेथे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहे. त्यामुळे हातगाडी धारक यांना नेहमीप्रमाणे बाजार तळ फेरीवाल्यांना हॉकर्स झोन करून देण्याची मागणी केली आहे. काही दिवसानंतर मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू होणार आहे. अशा वेळेस फेरीवाल्यांना त्रास न देता त्यांना तेथे व्यवसाय करू देण्याची मागणी देखील त्यांनी केली आहे.