• Wed. Dec 11th, 2024

काटवन खंडोबा रोडला गाझीनगर यंग पार्टीचा भंडारा

ByMirror

Aug 24, 2022

युवकांनी घडविले धार्मिक एकतेचे दर्शन

मोहरमच्या दहाव्याचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- काटवन खंडोबा रोड येथील गाझीनगर यंग पार्टीच्या वतीने मोहरमच्या दहाव्यानिमित्त सर्व धर्मियांसाठी भंडार्‍याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व धर्मिय युवकांनी एकत्र येऊन राबविलेल्या उपक्रमातून धार्मिक एकतेचे दर्शन घडले.


युवानेते ओंमकार दिलीप सातपुते व रिपाईचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के यांच्या हस्ते भंडार्‍याची सुरुवात करण्यात आली. यावेळी जावेद सय्यद, रवी घुंगासे, गाझीनगर यंग पार्टीचे गुलामअली शेख, इमरान शेख, अतिक बागवान, साहिल बागवान, अजहर शेख, मुद्दसर शेख, एजाज शेख, सोनू सय्यद, कैफ शेख, सद्दाम शेख, सिराज शेख, साकिब बागवान, दिपक गायकवाड, सागर दातरंगे आदी उपस्थित होते.


सुशांत म्हस्के म्हणाले की, गाझीनगर यंग पार्टी दरवर्षी राबवित असलेला अन्नदानाचा उपक्रम कौतुकास्पद आहे. सर्व जाती-धर्माच्या युवकांना बरोबर घेऊन राबविण्यात येणार्‍या उपक्रमातून सामाजिक व धार्मिक एकतेचे दर्शन घडत असल्याचे त्यांनी सांगितले. गुलामअली शेख यांनी गाझीनगर भागात सर्व जाती-धर्माचे युवक एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होत असतात. धार्मिक एकता, सौहार्द व राष्ट्रीय एकात्मतेसाठी युवकांनी योगदान देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. परिसरातील सर्व नागरिकांनी भंडार्‍याचा लाभ घेतला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *