कला व क्रीडा स्पर्धेचे बक्षिस वितरण
देशभक्तीच्या गीतांनी श्रोते भारावले
अहमदनगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट संचलित शहरातील ऐम इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये अमृत महोत्सवी वर्षाचा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांसाठी शाळेत विविध कला व क्रीडा स्पर्धा पार पडल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त सहभाग नोंदवला.
स्वातंत्र्य दिनी ध्वजारोहण करुन विद्यार्थ्यांचा देशभक्तीवर गीतांचा कार्यक्रम रंगला होता. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीवर गीते सादर केली. नफरत की लाठी तोडो…. या गीताद्वारे विद्यार्थ्यांनी सामाजिक एकता व बंधूभावचे दर्शन घडविले. हिंदुस्तान जिंदाबादच्या घोषणांनी शालेय परिसर दणाणून निघाला.
बॉक्सिंग स्पर्धेते बक्षिस पटकाविणार्या खेळाडूंना मुख्याध्यापक फैजान सय्यद यांच्या हस्ते मेडल देऊन गौरविण्यात आले. या खेळाडूंना क्रीडा शिक्षक वसिम शेख यांचे मार्गदर्शन लाभले. विविध स्पर्धा पर्यवेक्षक अरशिया तांबटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शाळेत 13 ऑगस्ट पासून विविध कला, क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.