• Wed. Dec 11th, 2024

एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेत एनजे लायन संघ विजयी

ByMirror

May 18, 2022

मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो -सचिन राणे

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात कार्यरत असलेल्या म्युचल फंड अ‍ॅडव्हायझरसाठी एन.जे. वेल्थ मॅनेजमेंटच्या वतीने एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. एनजे लायन विरुध्द एनजे इलेव्हन संघात झालेल्या अटीतटीच्या सामन्यात एनजे लायन संघ विजयी ठरला.
सावेडी येथील कराळे ग्रीन यार्ड टर्फ मैदानावर एसपीजे स्पोर्टस क्लबच्या वतीने या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन करण्यात आले होते. यामध्ये एनजे वॉरियर्स, एनजे इलेव्हन, एनजे लायन, एनजे सुपर किंग्ज, एनजे सुपर जायंट्स, एनजे डेव्हिल्स, एनजे रॉयल्स, एनजे चॅलेंजर या आठ संघाचा सहभाग होता. ही स्पर्धा एन जे वेल्थ मॅनेजमेंटचे सचिन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.


सचिन राणे म्हणाले की, आरोग्यमय जीवनासाठी मैदानी खेळाशिवाय पर्याय नाही. आरोग्य सदृढ असल्यास जीवन आनंदी बनते. मैदानी खेळाने मन प्रसन्न होऊन तणाव कमी होतो. म्युचल फंड मध्ये काम करणारे प्रतिनिधी दररोज धावपळ व तणावपूर्ण जीवन जगत असतात. त्यांनी एक विरंगुळा व मैदानी खेळाची आवड निर्माण करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.


एन.जे. पार्टनर्स प्रीमियर लीग 2022 क्रिकेट स्पर्धेतील एनजे लायन विजयी संघाचे कर्णधार प्रसन्ना खाजीवाले आणि उपविजयी संघ एनजे इलेव्हनचे कर्णधार नरेंद्र कुलकर्णी यांना चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेतील मॅन ऑफ दि सिरीज रुषभ प्रथमशेट्टी, उत्कृष्ट गोलंदाज सतलज सावंत व उत्कृष्ट फलंदाज श्रीपाल शहा यांचा देखील विशेष सन्मान करुन बक्षिस देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *