अनिता काळे समाजात रणरागिनी म्हणून आपले कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे -अलकाताई मुंदडा
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिजाऊ ब्रिगेडच्या विभागीय संघटक अनिताताई काळे महिलांच्या सर्वांगीन विकासासाठी देत असलेल्या योगदानाबद्दल व नुकताच एक्सलंट टीचर अवॉर्ड मिळाल्याबद्दल त्यांचा प्रयास व नम्रता दादी-नानी ग्रुपच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रयासच्या अध्यक्षा अलकाताई मुंदडा, उपाध्यक्षा सविता गांधी, नम्रता दादी-नानीच्या उपाध्यक्षा शोभा पोखर्णा, निसर्गोपचार तज्ञ हेमा सेलोत, स्वाती गुंदेचा, स्वप्ना शिंगी, शशीकला झरेकर, सुजाता पुजारी आदींसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
अलकाताई मुंदडा म्हणाल्या की, विविध क्षेत्रात योगदान देऊन अनिता काळे या समाजात रणरागिनी म्हणून आपले कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवीत आहे. विद्यार्थ्यांना घडविण्याबरोबरच समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्याचे त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे. त्यांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय पातळीवर अनेक पुरस्कार मिळाले असून, त्या ग्रुपच्या सक्रीय सदस्या असल्याचे अभिमान वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.
शिवछत्रपतीची प्रतिमा देऊन काळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना अनिता काळे म्हणाले की, महिलांनी नेहमी सक्षम राहिले पाहिजे. आपल्यातील कला-गुणांचा उपयोग कार्यकर्तृत्वाने समाजाचा व देशाचा विकास घडवावा. महिला सक्षमपणे एक कुटुंब, समाज व देश घडवू शकते. यासाठी महिलांनी सर्वच क्षेत्रात पुढाकार घेण्याचे त्यांनी आवाहन केले.