अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी सानप यांनी महत्त्वाची भूमिका बजावली -पै. नाना डोंगरे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी सामाजिक शांतता, सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी दिलेले योगदान व उत्कृष्ट कामगिरीबद्दल स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था व श्री नवनाथ युवा मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी शिरीष टेकाडे उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी अनेक गुन्ह्यांचा तपास लावण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर अनेक कुख्यात गुंड, दरोडेखोर त्यांनी जेरबंद केले. तसेच समाजकंटकांचा बंदोबस्त करण्यासाठी कठोर पावले उचलली असून, अशा विघातक प्रवृत्तींवर लगाम लावला आहे. कोरोना काळातही त्यांनी सामाजिक संघटनांना बरोबर घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य केले. अशा कर्तव्यनिष्ठ पोलीस अधिकार्यांमुळे कायदा सुव्यवस्था अबाधित असल्याचे पै. नाना डोंगरे यांनी सांगितले.