अहमदनगर(प्रतिनिधी)- इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेलेला प्रशांत भागचंद शेळके हा युवक घरी पुन्हा न परतल्याने पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशांत भागचंद शेळके हा आई-वडिलांसह कासार पिंपळगाव (ता. पाथर्डी) येथे राहतो. तो 18 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता इस्त्रीचे कापडे आणण्यासाठी गेला व पुन्हा घरी परतलेला नाही. त्यांचे मोठे बंधू योगेश शेळके शहरातील न्यु आर्टस महाविद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहे. त्याच्या वडिलांनी प्रशांत घरी आला नसल्याची माहिती योगेशला दिली. यानंतर नातेवाईक व गाव परिसरात विचारपूस केल्यानंतरही त्याचा शोध लागला नाही. त्याचे बंधू योगेश शेळके यांच्या फिर्यादीवरुन पाथर्डी पोलीस स्टेशनला हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.
प्रशांत भागचंद शेळके (वय 33 वर्षे), रंगाने गोरा, अंगाने मध्यम व उंची 6 फुट असून, अंगात पांढर्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पँट घातली आहे. हा व्यक्ती कोणाला दिसल्यास व माहिती मिळाल्यास पोलीसांशी किंवा 9423051221, 9420038594 या नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.