डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण वाचनालयाच्या वतीने होणार पुरस्कार वितरण
आमदार निलेश लंके व सिने कलाकार मोहनीराज गटणे यांना विशेष पुरस्कार
अहमदनगर (प्रतिनिधी)- स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने आदर्श शिक्षकांसह सामाजिक क्षेत्रात योगदान देणार्यांच्या सन्मानासाठी शिक्षक दिनी विविध राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले. सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणार्यांचा पुरस्काराने सन्मान केला जाणार असल्याची माहिती डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे यांनी दिली.
या कार्यक्रमात कोरोना काळात अनेकांचे जीव वाचविणारे व सर्वसामान्यांना आधार देणारे आमदार निलेश लंके यांना राज्यस्तरीय शौर्य गौरव पुरस्कार आणि सिने व नाट्य कलाकार मोहनीराज गटणे यांना कला गौरव विशेष पुरस्कार प्रदान केले जाणार आहे. तसेच संस्थेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार- शबनम समीर डफेकर (दौंड, जि. पुणे), क्रीडा शिक्षक लॉरेन्स अँथनी बलराज (ता. श्रीरामपूर), माधुरी मगर-काकडे (पुणे), प्रवीण शरद बोर्डे (पुणे) आदर्श शिक्षक, सुधीर भगवान डेंगळे (दौंड, जि. पुणे), प्रतिभा सुधीर डेंगळे (दौंड, जि. पुणे), मीनाक्षी कैलास कर्डिले (नगर), सहदेव मधुकर कर्पे (नगर), गणेश भरत वालझाडे (नगर), सचिन रामदास गवांदे (ता. अकोले), भाऊसाहेब सुखदेव थोरात (नगर), आनंदा खंडू झरेकर (ता. पारनेर), उमादेवी सतीश राऊत (नगर), शेख मीराबक्ष खुदाबक्ष बागवान (ता. श्रीरामपूर), आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार- शेख अब्दुल कादिर (नगर), अर्जुन सदाशिव भांगे (केडगाव),
आदर्श परिचारिका गौरव पुरस्कार- सविता मारुती ठोकळ (टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर), ज्योती विठ्ठल बेलोटे (वडझिरे, ता. पारनेर), समाज भूषण पुरस्कार- दिनकर जगन्नाथ सदाफळ (ता. श्रीरामपूर), डॉ. अॅड. जया बाळकृष्ण उभे (पिंपरी, पुणे), विद्या अरुण क्षीरसागर (श्रीरामपूर), इरफान जहागीरदार (नगर), कला भूषण पुरस्कार- दौलत पोपट पवार (राहुरी), अजय प्रकाश घोंगरे (श्रीरामपूर), बाबासाहेब शामराव जगताप (नगर), समाज रत्न पुरस्कार- विकास नारायण जगधने (नगर), योगेश पोपट पिंपळे (नगर), सदाशिव सुखदेव थोरात (श्रीरामपूर), सोनल गणेश तरटे (नगर),सोमनाथ मन्मत जंगम (केडगाव, नगर) यांना जाहीर करण्यात आला आहे.
विविध क्षेत्रात शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते व इतर क्षेत्रातील व्यक्ती रात्रंदिवस कष्ट करुन समाज घडविण्याचे कार्य करतात. मात्र त्यांचे कार्य प्रकाशझोतात येत नाही. त्यांचे कार्य समाजापुढे आनण्यासाठी व त्यांच्या कार्यातून इतरांना प्रेरणा मिळण्यासाठी त्यांचा सन्मान केला जाणार असल्याचे डोंगरे यांनी म्हंटले आहे.