जिल्हाधिकारी यांना निवेदन
सॉफ्टवेअरद्वारे आडनावावरुन सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात असल्याचा आरोप
अहमदनगर (प्रतिनिधी)- आडनावावरून ओबीसींचा डाटा गोळा करण्याला विरोध दर्शवून ओबीसींच्या घरोघरी जाऊन आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची माहितीचा इंम्पेरिकल डेटात समावेश करण्याच्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष प्रा. माणिक विधाते, राष्ट्रवादी ओबीसी सेलचे शहर जिल्हाध्यक्ष अमित खामकर, समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, महानगर अध्यक्ष दत्ता जाधव, प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गारुडकर, महानगर अध्यक्षा स्वाती सुडके, तालुकाध्यक्ष रामदास फुले, भरत गारुडकर, अनंत पुंड, सतीश मुंडलिक, दिपक खेडकर, प्रमोद शेजुळ, शरद ठोकळ, गणेश बोरुडे, जालिंदर बोरुडे, आकाश धर्मे, यशवंत गारदे, गणेश गोरे, अनिकेत आगरकर, राहुल दळवी, किरण जावळे, सौरभ भुजबळ, अनंत गारदे, नागेश गवळी, अशोक गोरे आदी उपस्थित होते.
सर्वोच्च न्यायालयाने निर्देशीत केल्यानुसार शासनाने ओबीसींची माहिती संकलित करण्यासाठी बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली समर्पित आयोग गठित केला आहे. या यंत्रणेच्या वतीने चुकीच्या पद्धतीने डेटा गोळा करण्यात येत आहे. सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित केली जात आहे. एम्पेरिकल डेटा घरोघरी जाऊन ओबीसींची खरी आर्थिक, सामाजिक, राजकीय स्थितीची माहिती संकलित होणे अपेक्षित होती. आयोग सॉफ्टवेअरद्वारे आडनावानुसार सदोष पद्धतीने माहिती संकलित करीत आहे. ही समस्त ओबीसी समाजाची फसवणूक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
समर्पित आयोगाद्वारे चुकीच्या पद्धतीने होणारे चुकीचे कामकाज तात्काळ थांबविण्यात यावे. तर तलाठी, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांच्या मार्फत योग्य ती माहिती संकलित करून शासनामार्फत सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवण्याची मागणी राष्ट्रवादी ओबीसी सेलच्या वतीने करण्यात आली आहे.