लाभ घेण्याचे ग्रामस्थांना आवाहन
अहमदनगर (प्रतिनिधी)- आई, वडिलांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त मुलांनी गावात मोफत नेत्रतपासणी व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबीर व रक्तदान शिबीराचे आयोजन केले आहे. स्व. केरु पुंजाजी शेळके व स्व. गं.भा. नंदा केरु शेळके यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रविवार दि. 10 एप्रिल रोजी अहमदनगर जिल्हा रुग्णालय यांच्या सहकार्याने रूपेवाडी (घोडेगाव- मिरी रोड) शेळके वस्ती येथे (ता. पाथर्डी) येथे सदर शिबीराचे आयोजित करण्यात आले असून, या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन बाबासाहेब शेळके, पोपट शेळके, दिलीप शेळके यांनी केले आहे.
सकाळी 9 वाजता जिल्हा शल्यचिकित्सक डॉ संजय घोगरे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमधडे व आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांच्या उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन होणार आहे. पारंपारिक व धार्मिक कार्यक्रमांना सामाजिक उपक्रमाची जोड देऊन राबविण्यात आलेल्या उपक्रमाची गावाच्या पंचक्रोशीत चर्चा आहे.