• Mon. Dec 9th, 2024

आईस हॉकी असोसिएशन ऑफ महाराष्ट्र निवडणूक बिनविरोध

ByMirror

May 20, 2022

नूतन कार्यकारणी जाहीर

अहमदनगर (प्रतिनिधी)- आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र यांची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध नुकतीच पार पडली. असोसिएशनची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. आईस हॉकी असोसिएशन ही महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्रातील एक महत्वाची संघटना आहे. आइस हॉकी असोसिएशन इंडिया यांना भारतीय क्रीडा मंत्रालय आणि आयओए तसेच आयओसी हिवाळी ऑलिंपिकची मान्यता असलेली महाराष्ट्रातील जुनी खेळ संघटना आहे.

आईस हॉकी असोसिएशन महाराष्ट्र या संघटनेचे नव निर्वाचित सदस्य आणि पदाधिकारी यांची निवड हॉटेल सरोवर कळवा नाका ठाणे येथे झालेल्या बैठकित बिनविरोध पार पडली. या निवडणुकीसाठी ऍड हॉक कमिटीचे मेम्बर, राष्ट्रीय संघटनेचे सदस्य आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या देखरेखेखाली निवडणूक प्रक्रिया पार पडली.

नवनियुक्त पदाधिकारी खालीलप्रमाणे:-

अध्यक्ष- अ‍ॅड. प्रमोद वाडेकर (पुणे), उपाध्यक्ष- ज्ञानेश काळे (सातारा), पुरुषोत्तम जगताप (सातारा), सचिव- विजयानंद सुरवसे (उस्मानाबाद), खजिनदार- सरुताई पुजारी (सांगली), सदस्य- संजय पाटील (नाशिक), अक्षय भोगे (नवी मुंबई), अजय पाटील (सांगली), मीरा डावरे (लातूर), ऋषिकेश नलवडे (मुंबई)

निवड झालेले सर्व पदाधिकारी आईस हॉकी असोसिएशन ऑफ इंडिया व क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आईस हॉकी या खेळाचा प्रचार व प्रसार करून गुणवंत खेळाडू घडविण्यासाठी विविध प्रशिक्षण वर्ग तसेच प्रशिक्षक यांच्यासाठी कार्यशाळा घेणार आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवून महाराष्ट्राचे नाव उंचावण्यात येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *