भिमा कोरेगाव येथून आलेल्या मशालचे स्वागत करुन जय भिमचा गजर
अहमदनगर (प्रतिनिधी)- आंतराष्ट्रीय मानवाधिकार संघ अहमदनगर जिल्हा शाखेच्या वतीने राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त मार्केटयार्ड चौकातील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तसेच भिमा कोरेगाव येथून आलेल्या मशालचे स्वागत करुन जय भिमचा गजर करण्यात आला. यावेळी आंतराष्ट्रीय मानवाधिकाराचे जिल्हाध्यक्ष प्रा. पंकज राजेद्र लोखंडे, पॅथर नेते मोहन ठोंबे, शरद महापूरे, रमेश आल्हाट, पॉल भिगारदिवे, नितिन साठे, विजय जाधव, संदीप कापडे, अनिल गायकवाड, संतोष वाघ, सदीप ठोंबे, विजय दुबे, शरद सरोदे, योगेश शिंगाडे, राजरत्न लोखंडे, जावेद सय्यद, वैशाली पेडलन, रजनी ताठे, प्रांजली लोखंडे, अक्षदा साठे आदी उपस्थित होते.
प्रा. पंकज लोखंडे म्हणाले की, वंचित घटकातील समाजाला डॉ.बाबासाहेबांच्या घटनेमुळे प्रतिष्ठा व सन्मानाची वागणुक मिळाली. तर संविधानाने न्याय हक्क प्राप्त झाला. वंचितांच्या उध्दारासाठी बाबासाहेबांनी आपले आयुष्य वेचले. त्यांचे विचार आजही सर्व समाजाला दिशादर्शक असून, त्यांच्या विचाराने समाजात कार्य केल्यास हीच त्यांना आदरांजली ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.