• Wed. Dec 11th, 2024

अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांचा राजकारणातील शिवाजी पुरस्काराने गौरव

ByMirror

Jun 13, 2022

सैनिक समाज पार्टीच्या माध्यमातून देत असलेल्या योगदानाबद्दल सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील भारतीय वायु सेनेचे सेवानिवृत्त अधिकारी तथा सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष अ‍ॅड. शिवाजी डमाळे यांना जवान फाऊंडेशनच्या वतीने राजकारणातील शिवाजी पुरस्काराने गौरविण्यात आले. राजकारणासह समाजकारणात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना सदर पुरस्काराने गौरविण्यात आले.


जळगाव येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात डमाळे यांना जवान फाऊंडेशनचे अध्यक्ष ईश्‍वर मोरे व ब्रिगेडियर सुधीर सावंत यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला. यावेळी कर्नल नायडू, सुनिताताई झिंजुर्डे आदींसह माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


अ‍ॅड. शिवाजी डमाळे सैनिक समाज पार्टीचे राज्याध्यक्ष म्हणून कार्य करत आहे. राजकारणातील प्रस्थापितांची घराणेशाही मोडून काढण्यासाठी व भ्रष्टाचार संपविण्यासाठी पक्षाच्या माध्यमातून त्यांचे कार्य सुरु आहे. देशभक्तीच्या विचारधारेने ते समाजातील प्रश्‍न सोडवत असून, वंचितांना आधार व न्याय मिळवून देण्यासाठी योगदान देत आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना राजकारणातील शिवाजी हा पुरस्कार देण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *