कोकाटे यांनी नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य चोखपणे केले -उपअभियंता विकास शिंदे
अहमदनगर (प्रतिनिधी)- नैसर्गिक आपत्ती व व्यवस्थापनाचे कार्य बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांनी चोखपणे केले. लोकसेवेच्या भावनेने त्यांनी प्रमाणिकपणे केलेले कार्य प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन अहमदनगर पाटबंधारे उपविभागाचे उपअभियंता विकास शिंदे यांनी केले.
अहमदनगर पाटबंधारे विभागाचे आपत्ती व व्यवस्थापनाचे बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांच्या सेवापुर्ती निमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने सत्कार करुन निरोप देण्यात आला.
अहमदनगर पाटबंधारे उपविभागाचे आपत्ती व व्यवस्थापनाचे बिनतारी संदेशक संजय कोकाटे यांच्या सेवापूर्तीनिमित्त आयोजित सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमात विकास शिंदे बोलत होते. यावेळी शाखा अभियंता रोहोकले, तांबोली, पाटबंधारे पतसंस्थेचे चेअरमन उमेश डावखर, महाराष्ट्र राज्य बिनतारी संदेश यंत्रणेचे अध्यक्ष सर्जेराव ठोंबरे, बहुजन अधिकारी कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष जालिंदर बोरुडे, वरिष्ठ लिपिक तोडमल, वरिष्ठ लिपिक गांगर्डे, आंधळे, दितेश पाटील आदी उपस्थित होते.
प्रास्ताविकात सर्जेराव ठोंबरे यांनी कोकाटे यांनी जलसंपदा विभागात 34 वर्ष दिलेल्या उत्कृष्ट सेवा दिली. पाटबंधारे विभागाच्या कर्मचार्यांचे प्रश्न सोडविण्यास आंदोलनात व संघटनेत सक्रीय सहभाग घेतला. संघटना बळकट करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचे सांगितले. संजय कोकाटे यांच्या सेवापुर्ती निमित्त जलसंपदा विभागाच्या वतीने त्यांचा सत्कार करुन निरोप देण्यात आला.
सत्काराला उत्तर देताना संजय कोकाटे यांनी निस्वार्थ भावनेने पाटबंधारे विभागात सेवा केली. काम करताना आपल्या सहकार्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांची प्रश्ने मार्गी लावली. निष्कलंक सेवा केल्याचे समाधान मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. तर सामाजिक कार्याची आवड असल्याने सेवानिवृत्तीनंतर देखील सामाजिक कार्यात व कर्मचार्यांच्या हितासाठी सक्रीय राहणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी भास्कर कोकाटे, वरिष्ठ लिपिक जाधव, कुलकर्णी, कराळे, ससे, पाचंगे, मराठे, पवार, राजेंद्र कोकाटे, हरेल, पाखरे आदींसह पाटबंधारे विभागाचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जालिंदर बोरुडे यांनी केले. आभार सचिन कोकाटे यांनी मानले.