• Thu. Dec 12th, 2024

अहमदनगर जिल्हा कारागृह प्रमुख व सहकारी वर्गाचा सन्मान

ByMirror

May 5, 2022

आत्मपरीक्षणाने जीवन व विचार बदलण्यास अध्यात्म प्रभावी – कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड

अहमदनगर (प्रतिनिधी)- कारागृह हे सुधारगृह बनले असून, यामधील व्यक्ती कैदी नसून, बंदी बांधव समजले जातात. कळत-नकळत किंवा परिस्थितीमुळे त्यांच्या हातून गुन्हा घडला. ते कायद्याच्या चौकटीत सापडले आणि कारागृहात आले आहे. संस्काराचा व शिक्षणाचा अभाव, दारिद्रय, चुकीची संगत या चुकांमुळे मनुष्य कारागृहात ओढला जातो. ते अध्यात्माशी जोडले गेले असेते तर कारागृहात नसते, असे प्रतिपादन जिल्हा कारागृह अधीक्षक पेट्रस गायकवाड यांनी केले.


शहरातील ब्रह्माकुमारीज विद्यालय शिवदर्शन भवन सावेडी येथे अहमदनगर जिल्हा कारागृह प्रमुख व त्यांचे सहकारी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कारागृह अधीक्षक गायकवाड बोलत होते. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या या सोहळ्यानिमित्त कारागृहातील अधिकारी व सहकारी यांच्यासाठी ध्यानधारणा सत्रही घेण्यात आले. यावेळी ब्रह्माकुमारी विद्यालय मुख्य संचालिका बी.के. राजेश्‍वरी दिदी, तुरुंग अधिकारी सुवर्णा शिंदे, देवका बेडवाल, पीएसआय सोनमाळी, वरिष्ठ लिपिक अधिकारी सुनिता धर्माधिकारी, लिपिक प्रमिला बडे, वैद्यकीय अधिकारी पांडुरंग जाधव, सुभेदार धनवंतसिंग सैनी, कारागृह शिपाई महेंद्र नन्नवरे, गणेश बेरड, उदयभान खेडकर, आकाश मोरे, अ‍ॅड. निर्मला चौधरी, बी.के. सुप्रभा बहन आदींसह कारागृहातील सहकारी व ईश्‍वरीय परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पुढे कारागृह अधीक्षक गायकवाड म्हणाले की, कारागृह वाईट नसून, अनेक क्रांतिकारकांनी कारागृहातून स्वातंत्र्य संग्रामासाठी लढा दिला. अनेक क्रांतिकारक घडले. अनेक ग्रंथसंपदेची निर्मिती करागृहात झालेली आहे. अज्ञान, वाईट संगतीने दिशा भरकटल्याने मनुष्याच्या हातून गुन्हा घडतो आणि तो व्यक्ती कारागृहात येतो. मनाच्या गुलामीतून सुटण्यासाठी आत्मपरीक्षण आवश्यक आहे. आत्मपरीक्षणाने जीवन व विचार बदलण्यास अध्यात्म प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले.


बी.के. राजेश्‍वरी दिदी म्हणाल्या की, मानवतेच्या दृष्टिकोनाने कारागृहात कार्य सुरु आहे. बंदिवानांना जगण्याची योग्य दिशा दाखवली जात आहे. मनुष्यला देवमनुष्यात बदलण्यासाठी अध्यात्माची जोड द्यावी लागणार असून, यामुळे बंदीवानांच्या विचार व कृतीत बदल होणार असल्याचे त्यांनी सांगितले. देवका बेडवाल यांनी वाल्याचा वाल्मिकी करण्याची क्षमता कारागृहातील पोलिसांमध्ये आहे. आरोपींना पकडून आणणारे पोलीस व त्यानंतर कारागृहातील पोलीस चावीच्या जोरावर बंदीवानांना त्यांचे विचार बदलण्याचे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सुवर्णा शिंदे यांनी कारागृहातील अनुभव सांगितले. राजेश्‍वरी दिदी यांनी राजयोगचे सत्र घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *