शुक्रवारी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल कॉलेजला परिषदेचा होणार शुभारंभ
अहमदनगर (प्रतिनिधी)- असोसिएशन ऑफ ओरल अॅण्ड मॅक्सीलो फेशियल सर्जन ऑफ इंडियाच्या तीन दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन विळदघाट येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील मेडिकल फाऊंडेशन येथे आयोजित करण्यात आले आहे. या परिषदेत राज्यातील चेहरा व जबड्यांचे सर्जन तर देशाच्या विविध ठिकाणाहून प्रशिक्षणार्थी विद्यार्थी सहभागी होणार आहे. यामध्ये मुख कर्करोग, चेहर्याचे व जबड्यांच्या हाडांचे फॅक्चर, म्युकर मायकोसिस आजाराच्या रुग्णांचे पुनर्वसन, चेहर्याचे सौंदर्य, दुभंगलेले ओठ व टाळू शस्त्रक्रिया या विषयावर तज्ञ डॉक्टर मार्गदर्शन करणार आहे. तसेच अद्यावत तंत्रप्रणालीचे साहित्य व त्याचे प्रात्यक्षिक पाहता येणार असल्याची माहिती परिषदेचे ऑर्गनायझिंग सचिव डॉ. संजय असनानी यांनी दिली.
शुक्रवार दि.8 एप्रिल रोजी या राज्यस्तरीय परिषदेचे उद्घाटन खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी यावेळी संघटनेचे राष्ट्रीय सचिव डॉ. गिरीशराव, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. प्रज्वलित केंडे, राज्य सचिव डॉ. विजय गिर्हे आदींसह राज्य पदाधिकारी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.तसेच यावेळी मुंबई येथील डॉ. मिना व्होरा, डॉ. अट्टर अग्रवाल, डॉ. वसंत शेवाळे यांना लाइफ टाईम अचीव्हमेंट अवॉर्ड उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते देण्यात येणार आहे.
गुरुवारी (दि.7 एप्रिल पासून) ओरल सर्जरीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांसाठी विविध प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच आंध्रप्रदेश, जमशेदपुर, छत्तीसगड येथून विद्यार्थी या परिषदेसाठी सहभागी होण्यासाठी येणार आहे. तीन दिवस परिषदेच्या ठिकाणी ट्रेड फेअर रंगणार असून, यामध्ये दंतरोग, ओरल अॅण्ड मॅक्सीलो फेशियल सर्जरी, दंतरोपण या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे विविध स्टॉल लावले जाणार असून, या स्टॉलला भेट देऊन अद्यावत प्रणालीची माहिती घेता येणार आहे. या परिषदेच्या आयोजनासाठी कॉन्फरन्स चेअरमन डॉ. नीलम अंधराळे, ऑर्गनायझेशन चेअरमन डॉ. किरण खांदे, सायंटिफिक चेअरमन डॉ. हरिष सलूजा, ऑर्गनायझिंग सचिव डॉ. संजय असनानी, खजिनदार अभिषेक मुळे प्रयत्नशील आहेत. परिषद यशस्वी करण्यासाठी डॉ. यशल जाधव, डॉ. कुणाल कोठारी, डॉ. अलका त्रिंबके, डॉ. कविता राणी, डॉ. योगीराज विरकर, डॉ. मोनल करकर, डॉ. अस्मिता लाड, डॉ. तन्वी संसगिरी परिश्रम घेत आहे.