भ्रष्टाचार विरोधात व दुर्बल वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी लढा दिल्याबद्दल समाजरत्न पुरस्काराने सन्मान
अहमदनगर (प्रतिनिधी)- अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते तथा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रामदास रोडे यांना राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अनेक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार उघड करून, दुर्बल वंचित घटकांच्या न्याय-हक्कासाठी लढा दिल्याबद्दल रोडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या पुरस्कार प्रदान कार्यक्रमासाठी राष्ट्रीय अध्यक्ष राजाभाऊ शेठ, राष्ट्रीय सचिव कृष्णा कवठणकर, राज्य अध्यक्ष विशाखाताई पराडकर, डॉ. प्रसाद पाण्डेय उपस्थित होते.
पारनेर तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातून आलेले अरुण रोडे यांचे अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु आहे. रोडे यांनी पारनेर तालुका सैनिक सहकारी बँकेतील भ्रष्टाचाराबाबत तीन वर्षे पाठपुरावा करून सभासदांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले. अनेक शेतकर्यांच्या न्याय हक्क व जमिनी मिळवून देण्यासाठी त्यांनी आंदोलने व उपोषण केले. पारनेरसह जिल्ह्यातील अवैद्य वाळू व्यवसाय व दारू व्यवसाय बंद होण्यासाठी त्यांचा सातत्याने लढा सुरु आहे. अनेक शासकीय कार्यालयातील भ्रष्टाचार त्यांनी उघडकीस आनण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे. तर समाजातील वयोवृध्दांना पेन्शन योजना, परितक्ता महिला व गोरगरिबांना शासकीय योजना मिळवून देण्यासाठी समितीच्या माध्यमातून त्यांनी कामे केली. हे काम करत असताना त्यांच्यावर अनेक आरोप होऊन खोटे गुन्हे देखील दाखल झाले. याची पर्वा न करता त्यांनी आपले कार्य सुरु ठेवले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना 2021-22 चा समाजरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येत असल्याची माहिती समितीचे राष्ट्रीय सचिव कृष्णा कवठणकर यांनी दिली. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल अरुण रोडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.