सर्व कामगारांचे कार्य सेवाभावाने सुरु -रमेश जंगले
अहमदनगर (प्रतिनिधी)- अरणगाव (ता. नगर) येथे लाल बावटा जनरल कामगार युनियन संलग्न अवतार मेहेर बाबा ट्रस्ट कर्मचारी युनियन शाखेच्या फलकाचे अनावरण ट्रस्टचे विश्वस्त रमेश जंगले यांच्या हस्ते झाले. यावेळी लाल बावटाचे जिल्हा सचिव अॅड. कॉ. सुधीर टोकेकर, ट्रस्टचे विश्वस्त राजू प्रसाद, सोसायटीचे चेअरमन ज्ञानदेव शेळके, युनिट अध्यक्ष कॉ. सतीश पवार, सचिव विजय भोसले, उपाध्यक्ष संजय कांबळे, सदस्य अनिल फसले, सुनील दळवी, बबन भिंगारदिवे, राधाकिसन कांबळे, सुभाष शिंदे, प्रभावती पाचारणे, सुनिता जावळे आदींसह युनियनचे सदस्य असलेले कामगार वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
रमेश जंगले म्हणाले की, सर्व कामगार एकत्र येऊन युनियनच्या वतीने सुरु असलेले कार्य कौतुकास्पद असून, सर्व कामगारांचे कार्य सेवाभावाने सुरु असून, ते एक प्रकारे बाबांची सेवा करत आहे. ट्रस्टच्या कामांना प्राधान्य देऊन सेवा देण्याचे त्यांनी आवाहन केले. विश्वस्त राजू प्रसाद यांनी अवतार पुरुषाचे कार्य ट्रस्टचे सर्व सेवक वर्ग करीत असून, त्यांच्या सेवेची सर्वांना जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.
अॅड. कॉ. सुधीर टोकेकर म्हणाले की, युनियनची स्थापना होऊन पाच वर्षे झाली. या पाच वर्षात कामगारांच्या न्याय, हक्कासाठी युनियनच्या वतीने संघर्ष करण्यात आला. ट्रस्टने देखील मनाचा मोठेपणा दाखवित कामगारांना महागाईच्या काळात जगता येईल अशी पगारवाढ दिली आहे. सर्व कर्मचारी युनियनच्या माध्यमातून एकत्र येऊन व्यवस्थापनाला चांगली सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले. तर कामगारांसाठी केलेली पगारवाढ व कोरोना काळात आधार दिल्याबद्दल ट्रस्टचे त्यांनी आभार मानले. युनिट अध्यक्ष सतीश पवार यांनी ट्रस्ट व कामगार एकाच कुटुंबातील असून, युनियन यामधील दुवा असल्याचे सांगितले. पाहुण्यांचे स्वागत उपाध्यक्ष संजय कांबळे यांनी केले. आभार अनिल फसले यांनी मानले.