देश रक्षण करणारे हात पर्यावरण रक्षणासाठी सरसावल्याचा अभिमान -ह.भ.प. गणेश महाराज चौधरी
अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील जय हिंद फाऊंडेशनच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जिल्ह्यातील ऐतिहासिक, पर्यटन स्थळ, डोंगररांगा, उजाड माळरानं हिरवाईने फुलविण्यासाठी माजी सैनिकांनी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत कोल्हार (ता. पाथर्डी) येथील तीर्थक्षेत्र कोल्हुबाई माता गडावर वृक्षरोपण अभियान राबविण्यात आले. गडावरील स्वागत कमान व रस्त्यांच्या दुतर्फा ही झाडे लावण्यात आली.
या वृक्षरोपण अभियानात ह.भ.प. गणेश महाराज चौधरी, दिनकर डमाळे, माजी सभापती संभाजी पालवे, माजी मुख्याध्यापक महादेव पालवे, निवृत्त पोलीस अधिकारी शंकर डमाळे, माजी चेअरमन सोपानराव पालवे, उपसरपंच कारभारी गर्जे, जय हिंदचे शिवाजी पालवे, किशोर पालवे, सुभेदार अशोक गर्जे, आजिनाथ पालवे, विष्णू गिते, नामदेव गिते, बाबाजी पालवे, मेजर मनसजन पालवे, करण जावळे, सुभेदार गोरक्ष पालवे, रवी पालवे, रमेश जाधव, संदीप पालवे, चंदू नेटके, नामदेव पालवे, गणेश पालवे, अशोक आव्हाड, रावसाहेब जाधव, बाजीराव गिते, सतिष साबळे, आदिनाथ पालवे, बाबासाहेब घुले, नवनाथ जावळे, ह.भ.प. सुधाकर सानप, बबन भुजबळ, एकनाथ कोकरे, वाघमोडे महाराज, ससाणे महाराज आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
ह.भ.प. गणेश महाराज चौधरी म्हणाले की, जय हिंदची निसर्ग फुलविण्याची चळवळ प्रेरणादायी आहे. सातत्याने माजी सैनिक वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करीत आहे. देश रक्षण करणारे हात पर्यावरण रक्षणासाठी सरसावल्याचा अभिमान असून, वृक्षरोपणाने सजीव सृष्टील नवसंजीवनी मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
माजी सभापती संभाजी पालवे म्हणाले की, जय हिंद फाऊंडेशनने संपुर्ण जिल्ह्यात वृक्षरोपण मोहिम राबवून पर्यावरण चळवळीला गती दिली आहे. माजी सैनिकांनी पर्यावरण प्रेमीची एक वेगळी ओळख निर्माण केली असून, या मोहिमेद्वारे निसर्गाला पुनर्वैभव प्राप्त होणार असल्याचे त्यांनी सांगितले. फाउंडेशनचे शिवाजी पालवे यांनी कोल्हार गावामध्ये आतापर्यंत जवळपास अडीच हजार झाडे लागवड केलेली असून, सर्व झाडांचे संवर्धन होत आहे. या चळवळीत लोकसहभाग महत्त्वाचा असून, कोल्हारच्या ग्रामस्थांनी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनासाठी मोठे सहकार्य केले आहे. कोल्हार गाव महाराष्ट्रातील सर्वात जास्त वडाची झाडे असलेले गाव म्हणून राज्याच्या नकाशावर येणार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी मुख्याध्यापक महादेव पालवे यांनी फाऊंडेशनने लावलेली 150 झाडे गावाच्या वतीने संवर्धन करण्याचा संकल्प करुन उपस्थितांचे आभार मानले.